मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेदम मारहाण
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेदम मारहाण
img
दैनिक भ्रमर
संभाजीनगर : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास तब्बल दोनशे ते अडीचशे जणांच्या जमावाने घरातून बाहेर काढत या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. दीपक बद्री नागरे असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. 

दीपक हा दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याने जरांगे यांच्यासोबचा सेल्फी स्टेटसला ठेवताना एका ओळीचा आक्षेपार्ह मजकूर लिहल्याचा आरोप होत आहे. तर त्याच्या स्टेटसचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जमावाने मुकुंदवाडी भागात राहत असलेल्या दीपक नागरेचं घर गाठत त्याला मारहाण केली आहे. दीपक विरोधात मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. हमराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट असल्यामुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये 200 ते 250 जणांचा जमाव जमा झाला होता. त्यानंतर  संतप्त नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू झाली.

तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढत मारहाण केली. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. या प्रकरणी नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नागरे या तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group