मनोज जरांगे यांची मोठी घोषणा :
मनोज जरांगे यांची मोठी घोषणा : "या" तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार
img
Dipali Ghadwaje
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. एका वर्षात त्यांच्या आंदोलनाने राज्यात मोठी हालचाल घडवली आहे. या आंदोलनाचा फटका लोकसभेला दिसून आला आहे. 

मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून समाजाला वाट पाहावी लागली आहे. सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

16 सप्टेंबर रोजीपासून उपोषण

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या एक दिवसाअगोदर 16 सप्टेंबर रोजीपासून उपोषणाची सुरुवात करणार आहे. ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत अंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या. मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. त्यांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर धनंजय मुंडे हे सुद्धा अंतरवाली सराटीत दाखल झाले आणि त्यांची भेट घेतल्याची बातमी येऊन ठेपली. त्यानंतर आता कोणती खलबतं झाली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी अचानक उपोषणाचे हत्यार उपसले हे समोर आलेले नाही.


काय म्हणाले जरांगें पाटील?

यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा सामाजातील तरुणांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचे आवाहन केले. कोणत्याही कारणामुळे आत्महत्या करु नका, असे आवाहन त्यांनी तरुणांना केले. तरुणांनी संयम ठेवावा. आरक्षणाचा प्रश्न सुटण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी मी मरायला तयार आहे, काही आमदार माझे तुकडे करणार असे म्हटले, मी शहीद होण्यास तयार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group