मुंबईतील साकीनाका येथे धक्कादायक घटना घडली. इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाने ३ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोस्को) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली.
या घटनेत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत तक्रार दाखली केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा नववीत शिकत आहे. पीडित मुलीचं कुटुंब साधारण 15 दिवसांपूर्वी सोलापूरमधून मुंबईत आलं आहे. पीडित मुलीची आवश्यक आरोग्य तपासणी राजवाडी हॉस्पिटलमध्ये केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.