धक्कादायक! शिक्षकाने केला ९वीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग
धक्कादायक! शिक्षकाने केला ९वीच्या विद्यार्थीनीचा विनयभंग
img
Dipali Ghadwaje
पुण्यामध्ये शाळकरी मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय? 

पुण्याच्या हडपसरमधील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. पीडीत मुलगी नववीमध्ये शिकते. या घटनेनंतर पीडित मुलगी रडत रडत घरी गेली. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईसोबत पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हडपसर पोलिसांनी याप्रकरणी शिक्षकाविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी शिक्षक पीडित मुलीला गेल्या अनेक महिन्यांपासून त्रास देत आहे. 

वर्गामध्ये शिकत असताना तू माझ्याकडेच बघत जा, इकडे तिकडे बघू नकोस, तुला मी घरी सोडतो, असं म्हणत शिक्षक तिला नेहमी त्रास द्यायचा. २६ ऑगस्टला या शिक्षकाने शाळेच्या मैदानामध्ये उभ्या राहिलेल्या पीडित मुलीच्या जवळ जाऊन तिला तू शिट्टी का वाजवली? असं विचारत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे पीडित मुलगी खूप घाबरली. आतापर्यंत हा शिक्षक कसा वागत होता याबाबत ती शांत होती. पण २६ ऑगस्टला घरी गेल्यानंतर तिने आपल्या आईला घडलेली घटना सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group