पूजा खेडकर प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्यावर खोट्या माहितीच्या आधारे परीक्षा पास केल्याचा आरोप आहे. नाव, फोटो आणि स्वाक्षरी बदलून अनेकवेळा परीक्षा दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. यूपीएससीच्या कारवाईला पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. पूजा खेडकरने यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यूपीएससीच्या आरोपात तथ्य नसल्याचं पूजा खेडकरचे म्हणणं आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप यूपीएससीनं केला होता. पण नाव बदलल्याची माहिती आपण आधीच यूपीएससीकडे दिली असल्याचं पूजा खेडकरनं स्पष्टीकरण दिलं आहे.
याआधीच यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. इतकंच नाही तर पूजा खेडकर यांना पुन्हा परीक्षेला बसता येणार नसल्याचं देखील यूपीएससीने म्हटलं होतं. पूजा खेडकर प्रकरण अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत आलं होतं. खोटी माहिती सादर करुन परीक्षा पास झालेल्या आरोप पूजा खेडकरवर होता. पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीने गुन्हा दाखल केला होता. अटक होऊ नये म्हणून आधीच पूजा खेडकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केलाय. पूजा खेडकरला जामीन मिळाल्यास चौकशीत त्या सहकार्य करणार अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
दरम्यान , पूजा खेडकर प्रकरणी आता उद्या पुन्हा दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर उद्या निर्णय होणार आहे.