विधासभेच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये जागावाटप वरून चांगलीच शर्यत जुंपल्याचे दिसतेय. आता महायुती मध्येही जागा वाटपावरून चर्चा सुरु झाली आहे . भाजप 160 जागांवर लढणार या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे. अमित शाह हे रविवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शहांच्या या दौऱ्यात भाजप पदाधिकारी, नेत्यांनी विधानसभेला भाजपने 160 जागा लढल्या पाहिजेत, अशी मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
अमित शाह यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 125 जागा भाजपने जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. तर, 75 जागांची जबाबदारी भाजप नेत्यांना वाटून देण्यात आली आहे. भाजपला 125 जागांवर विजय मिळवण्यासाठी 150 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढावी लागणार आहे. त्यामुळे भाजप 160 जागांवर लढणार या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे. 288 मतदारसंघापैकी भाजप 160 जागांवर लढली तर अवघ्या 128 जागा शिल्लक राहतात. त्यामुळे अजित पवार गट 64 आणि शिवसेने शिंदे गट 64 जागांवर लढावे लागू शकते
भाजप पदाधिकाऱ्यांनी अमित शाह यांच्याकडे 160 जागा लढण्याची मागणी केली त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे देखील तेथे उपस्थित होते. मात्र, ही भाजपची अधिकृत बैठक नव्हती. अनौपचारिक गप्पांमध्ये ही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे यावर शिंदे गटाकडून अजुनपर्यंत कोणीच काही बोलले नाही.
भाजपकडून 160 जागांवर दावा करण्या आधीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे गट 120 जागांवर लढणार असल्याचा दावा केला होता. तर, अजित पवारगटाकडून देखील 80 पेक्षा अधिक जागांवर दावा करण्यात येतो आहे.
दरम्यान , दिल्लीला परत जाताना अमित शाह यांनी विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.