Nashik : चाकूचा धाक दाखवून पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Nashik : चाकूचा धाक दाखवून पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- चाकूचा धाक दाखवून बापाने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नाशिकरोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही नाशिकरोड परिसरात राहते. दि. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मोठी मुलगी घराच्या बाहेर भांडी घासत होती, तर फिर्यादीचा पती घरात टीव्ही पाहत होता. त्यावेळी फिर्यादी ही तिच्या दोन लहान मुलींना घेऊन किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेली होती.

ही संधी साधून फिर्यादीच्या पतीने भांडी घासत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात बोलावून घेत आतून कडी लावून घेतली. तिला घराच्या वरच्या मजल्यावर घेऊन जात तिला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर तिला निर्वस्त्र करून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले, तसेच ही बाब जर तुझ्या मम्मीला सांगितलीस, तर तुझ्यासह तुझी मम्मी आणि तुझ्या दोन्ही बहिणींना चाकूने मारून टाकीन, असा दम दिला.

ही बाब तिची आई घरी आल्यानंतर तिला पीडित मुलीने हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीसह फिर्यादी महिलेने नाशिकरोड पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बापाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group