मुंबई : आताच एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच राज्याच्या माजी पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्या. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केलं होतं. त्यानंतर आता महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट झाल्यानंतर शुक्ला या फडणवीसांच्या भेटीला गेलयाची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस आणि इतर विरोधी नेत्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस हे या आधी राज्याचे गृहमंत्री होते. आताही मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे. तसेच गृहखातंही त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी मिळावी किंवा इतर कोणतीही मोठी जबाबदारी मिळावी यासाठी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.