ललित पाटील प्रकरणात फडणवीसांचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंसोबतच्या कनेक्शनबाबत खळबळजनक दावा
ललित पाटील प्रकरणात फडणवीसांचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंसोबतच्या कनेक्शनबाबत खळबळजनक दावा
img
दैनिक भ्रमर
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेला होता. यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढताना ललित पाटील प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एक गौप्यस्फोट केला. 

यावेळी फडणवीसांनी ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य कनेक्शनवर बोट ठेवले. त्यामुळे आता या सगळ्याला ठाकरे गट कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ललित पाटील याला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद सोपवले होते. ललित पाटील याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने याप्रकरणात लगेच पीसीआर देण्यात आला. ललित पाटील याला पीसीआर मिळाल्याबरोबर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही. पोलिसांकडून ललित पाटील याची चौकशीच झाली नाही. पीसीआरचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला एमसीआर द्यावा लागला. या काळातही त्याची चौकशीच झाली नाही. चौकशी झाली नसेल तर उद्या एखाद्या आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला भरायला झाला तर तो कसा भरणार?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. 

दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? यामागील कारण काय होतं? या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते. ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कोणाचा दबाव होता. या प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण मी त्या आत्ताच सांगणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group