लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आग, कँटीनमध्ये उडाला भडका
लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आग, कँटीनमध्ये उडाला भडका
img
Dipali Ghadwaje
मुंबईमधील कुर्ल्याजवळील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आग लागली. धुराचे लोट बाहेर पडत होते. टर्मिनसवरील कँटीनमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरील कँटीनमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आग इतकी पसरली की आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते.

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. एलटीटीवरील फलाट क्रमांक १ वर जन आहार कँटिनमध्ये ही आग लागली. दुपारी साधारण पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. काही वेळातच या आगीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्टेशनच्या इमारतीतून वरच्या बाजूला आगीचे लोळ आणि धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असताना या व्हिडिओत दिसत होते.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group