अग्नितांडव!  पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला आग ; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
अग्नितांडव! पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला आग ; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
img
Dipali Ghadwaje
आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशातच नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावणे एमआयडीमधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराळे लोळ पसरले आहेत.  

दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीच कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.  

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल कंपनी आहे. प्लॉट नंबर W5 आणि W6 वर असलेल्या या कंपनीत गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला अन् एकापाठोपाठ एक असे भीषण स्फोट झाले. 

आग इतकी भीषण होती, की परिसरात धुराचे लोळ पसरले. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, कंपनीला आग लागल्याचं कळताच परिसरात मोठा हाहाकार उडाला. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group