दुर्दैवी! पोटमाळ्यावर झोपले अन् आगीत होरपळल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
दुर्दैवी! पोटमाळ्यावर झोपले अन् आगीत होरपळल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
आगीमध्ये होरपळून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवडमधल्या वाल्हेकरवाडी येथे ही  घटना घडली आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली आहे. या घटनेनंतर परिसरत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ललित अर्जुन चौधरी  (21 वर्षे)  आणि कमलेश अर्जुन चौधरी (23 वर्षे)  या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आधी लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. 

स्थानिक रहिवाशांनी दीलेल्या माहितीनुसार, लाकडाच्या वखारीला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे त्याला लागून असल्यामुळे ही आग आणि धूर ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर शेडमध्ये गेला. त्या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेल्या दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध झाल्या. आगीत पोटमळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला आहे.
 
दरम्यान परिसरातील रहिवासी सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली. आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी  बादलीच्या साह्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याच प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं. आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group