नाशिक :- 50 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 30 हजार रुपयांची लाच घेताना चांदवड तालुक्यातील सरपंच व उपसरपंचाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (वय 55) व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (वय 45) असे लाच घेणाऱ्या दोघांची नावे आह.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परिषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र या बांधकामाचे बिल अद्याप अप्राप्त होते. हे बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त होते.
या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने भास्कर गांगुर्डे यांनी सही करून पाठवण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपये लाचे मागितली. तडजोडी अंती 30,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे केले. ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पो.ना. दिपक पवार, पो.शि. संजय ठाकरे यांनी केली.