12 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
12 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक : 12 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

प्रदीप कुमार वामनराव राठोड, (वय 34) मुख्याध्यापक, शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, म्हळसर कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे  (रा. विद्या कॉलनी, स्वामीनारायण मंदिरा मागे दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे.) व हनुक फुलसिंग भादले, (वय 47), कार्यालय अधीक्षक, शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, (रा. साईबाबा अपार्टमेंट मांडळ शिवार शिरपूर जि. धुळे.) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की,  यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात. या महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील 9 महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते.

त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित 2 महिन्याचे  पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी राठोड व भादले यांनी तक्रारदार यांच्याकडून 20,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 12,000 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. ही लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोनि हेमंत बेंडाळे, रूपाली खांडवी, पोहवा राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, पोशि रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, पोहवा चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group