तारीख ठरली! 'या' तारखेला होणार विधानसभेचं विशेष अधिवेशन
तारीख ठरली! 'या' तारखेला होणार विधानसभेचं विशेष अधिवेशन
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व अटी मान्य करत अधिसूचना काढत मराठा आरक्षण देण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिलं होतं. आता मराठा आरक्षणासाठी १५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.

१५ तारखेला विधानसभेचं विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहे. अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. अधिवेशनात नव्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group