नाशिक लोकसभेच्या उमेदवाराबाबत बोलताना ना. छगन भुजबळ म्हणाले...
नाशिक लोकसभेच्या उमेदवाराबाबत बोलताना ना. छगन भुजबळ म्हणाले...
img
सुधीर कुलकर्णी

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ इच्छुक असल्याचे केवळ मीडियानेच उठवलेले नाव असून महायुतीमध्ये अजून चर्चा सुरू आहे, बऱ्याच गोष्टीवर एकमत झाले आहे, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.

महायुती मधील सर्व पक्षांचे नेते कुठे राग रुसवे आहेत का ते तपासत आहेत, नाशिकची जागा आम्हाला पाहिजे म्हणून काही लोक गेले आहेत मात्र काय परिस्थिती आहे म्हणून राष्ट्रवादी घेत आहे त्याचप्रमाणे अन्य पक्षाचे पक्ष देखील गोषवारा घेत असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

भुजबळ यांच्या चंद्राई या निवासस्थानाजवळील कार्यालयात बोलताना ते म्हणाले की, महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचा असल्याने प्रत्येक पक्ष आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र बसून ठरवीत आहे. जो उमेदवार ठरेल तिन्ही पक्ष त्याला मजबुतीने मदत करेल.

मी कोणासाठी ही आग्रह धरलेला नाही. आम्हाला शिंदे गटाएवढ्या जागा हव्यात फक्त एवढीच मागणी केली होती. सर्व प्रयत्न महायुतीचे सर्वाधिक खासदार निवडून यावे यासाठीच असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरे, विकास भुजबळ, राजाभाऊ खेमनार,  रंजन ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group