शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. कल्याणमधून वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी एकूण 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
4 उमेदवार जाहीर
कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगले सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कामडी तर जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान जळगावमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश झाला.