उद्धव ठाकरेंना धक्का ; जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला , 'हे' आहे कारण
उद्धव ठाकरेंना धक्का ; जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला , 'हे' आहे कारण
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकांची तारीख घोषित होताच प्रचाराला धूमधडाक्यात सुरूवात झाली असून जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे.  राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या लढत पाहायला मिळणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला  मोठा धक्का बसला आहे.

जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

या मतदारसंघात एमआयएम कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयएमकडून नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी 'एक्स'वर पोस्ट करीत त्यांचे नाव जाहीर केले आहे. 

किशनचंद तनवाणी शिंदे गटात करणार प्रवेश

यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार होती. मात्र, आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात 2014 सारखी परिस्थिती म्हणजे एमआयएमचा उमेदवार निवडून येवू नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या तोंडावर मोठा भूकंप पहायला मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group