भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची धाकधूक वाढली! 'हे' आहे कारण
भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची धाकधूक वाढली! 'हे' आहे कारण
img
Dipali Ghadwaje
जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीतील भारतीय जनता पक्षातर्फे स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. त्यानतंर आता महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षातर्फे करण बाळासाहेब पवार यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहिर झाल्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत होते. 

मात्र माजी खासदार ए.टी.पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अंतर्गत भेटीगाठी घेणे सुरू केल्याने भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहिर झाली, त्यानंतर विरोधी शिवसेना ठाकरे गटातर्फे कुलभूषण पाटील,ललिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

तर दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्याने माजी खासदार उन्मेश पाटील यांची उघड नाराजी होती. त्या नाराजीतूनच उन्मेश पाटील यांनी पारोळ्याचे भाजपचे युवक पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह भाजपला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.  

त्यानंतर भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात गेलेले युवा कार्यकर्ते करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली. आणि जळगाव लोकसभेतील लढतीचे चित्र एकदम पालटले. भारतीय जनता पक्षात फुट पडताच माजी खासदार ए. टी.पाटील यांनीही आपल्या पक्षातील उमेदवारीचा दावा प्रबळ केला आहे.

त्यांनी दिल्ली येथील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे स्मिता वाघ यांचा प्रचार सुरु असताना दुसरीकडे ए.टी.पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरु केल्याने वाघ यांची धाकधूक वाढली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group