राज्याचा राजकारणात सध्या मोठं मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. दरम्यान आता अशीच एक ओठी घडामोड समोर आलीय. लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. या चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपण पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचंही माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र, लोकसभेच्या निवडणुका होऊन काही महिने उलटले तरीही अद्याप एकनाथ खडसेंचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाही.
दरम्यान आता ,भाजपाकडून अद्याप प्रवेशाबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. मी आणखी काही दिवस भाजपाची वाट पाहील. अन्यथा मी पुन्हा शरद पवार गटात जाईल, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. मी अजूनही शरद पवार गटाचा सदस्य आहे. मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला. मात्र, त्यांनी तो राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शरद पवारांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्यास विरोध केलेल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
एकनाथ खडसे यांनी पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत दिलेत. भाजपकडून चांगला प्रतिसाद मिळत नाही. अशी परिस्थितीत भाजपमध्ये राहणं आता योग्य नाही, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलंय. तावडे, नड्डांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. मात्र काही जणांनी विरोध केला असावा, त्यामुळे प्रवेश जाहीर करण्यात आला नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय.