मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
img
Dipali Ghadwaje
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिखर बँक घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या क्लीनचीटला आव्हान देणाऱ्या याचिकांवर  5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना 'क्लीन चिट' देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यानंतर आता या क्लीनचीटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे  शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची  चिंता वाढली आहे. 

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.

हेही वाचा >>>> धक्कादायक : आधी तिची हत्या केली अन् मग स्वत:वरच झाडली गोळी, नेमकं काय आहे प्रकरण?

मात्र, त्याला विरोध करत चार नवीन याचिका मुंबई  सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत. माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ असराजी साबळे, रामदास पाटीबा शिंगणे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत चार स्वतंत्र निषेध याचिका दाखल केल्या आहेत. 

ईओडब्ल्यूने सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना 'क्लीन चिट' देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत यापूर्वी सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत.  त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. 

हेही वाचा >>>>> सावधान! पुढील 3-4 दिवस 'या' भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group