लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी गैर प्रकारांना आळा! ५० टक्के मतदान केंद्रांवर यंदा वेब कास्टिंग यंत्रणा
लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी गैर प्रकारांना आळा! ५० टक्के मतदान केंद्रांवर यंदा वेब कास्टिंग यंत्रणा
img
Dipali Ghadwaje
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के म्हणजे सुमारे ५० हजार मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडीओ चित्रीकरण (वेब कास्टिंग) करण्यात येणार आहे. संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण केले जाणार असून त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केले जाणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी गैर प्रकारांना आळा बसावा यासाठी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे अधिकाऱ्यांना कार्यालयात बसूनच मतदान केंद्रातील हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.

जिल्ह्यातील १ हजार ३८ मतदान केंद्रांवर ही यंत्रणा कार्यांन्वित राहणार असून त्यामुळे मतदान कक्षातील प्रत्येक घडामोळीवर अधिकारी वॉच ठेवतील. लाेकसभा निवडणुकीची अधिसूचना २८ मार्च राेजी जाहीर झाल्यानंतर ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्‍यात आले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान एकूण २८ व्यक्तिंनी ४० अर्जांची उचल केली हाेती.

५ एप्रिल राेजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. अखेर १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. एकीकडे उमेदवारी अर्जांबाबत ही प्रक्रिया राबवत असताना निवडणूक विभागाकडून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठीही नियाेजन करण्यात आले.

मतदान केंद्र अथवा बाहेर कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार होऊ नये यासाठी मतदान केंद्र परिसरातील तगडा पाेलिस बंदाेबस्तही तैनात करण्यात येणार आहे. मात्र यापूर्वी मतदान केंद्रात वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्येही शाब्दीक वाद झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वच केंद्रांवर एकाच वेळी तातडीने पाेहाेचणे शक्य नसल्याने भारत निवडणूक आयाेगाच्या निर्देशानुसार ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. वेब कास्टिंगमुळे आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधितांना सूचनाही देता येतील.

एक हजार ३८ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व लाेकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेब कास्टिंगमुळे त्या-त्या मतदान केंद्रातील हालचाली पाहता येणार आहेत. एकूण सात ठिकाणी याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

या मतदान केंद्रांवर करणार चित्रीकरण
लाेकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. त्यात अकोट विधानसभा मतदारसंघातील १६८, बाळापूरमधील १७०, अकोला पश्चिममधील १६०, अकोला पूर्व मधील १७७, मूर्तिजापूर मधील १९३, रिसोड विधानसभा मतदारसंघातील १७० केंद्रांचा समावेश आहे.

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group