पुण्यात २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर प्रचार सभा ; असा असेल पोलीस बंदोबस्त
पुण्यात २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर प्रचार सभा ; असा असेल पोलीस बंदोबस्त
img
Dipali Ghadwaje
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहेत. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका आहेत.अशातच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेसाठी पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पुण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पाच हजार पोलीस तैनात असणार आहेत. या सभेत सहभागी नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गांची पाहणी केली आहे. यावेळी शहरात मोदींच्या सभेला भाजपने सुमारे ६० हजार नागरिक जमण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पार्किंग आणि वाहतूक मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसंच सभास्थानी मोबाईल व्यतिरीक्त कोणतीही वस्तू नेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. जिल्ह्यांतून पोलिसांच्या पाच जादा तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. 

याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणाही बंदोबस्तात असणार आहेत. पुण्यात स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यात तगडा बंदोबस्त करण्यात येत आहे. 
 
तसेच महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे.कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. 

या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group