नाशिकमध्ये  विविध कारणांतून पाच जणांच्या आत्महत्या
नाशिकमध्ये विविध कारणांतून पाच जणांच्या आत्महत्या
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांनी गळफास घेऊन, तर एका जणाने टॉयलेट क्लिनर पिऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.

आत्महत्येचा पहिला प्रकार पंचवटीत घडला. सिद्धेश्वर देवीदास चव्हाण (वय 43, रा. न्हावी गल्ली, काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा) यांनी राहत्या घराच्या हॉलमध्ये सिलिंग फॅनच्या हुकास नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर हेमंत पवार यांनी चव्हाण यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार वाडेकर करीत आहेत.

आत्महत्येचा दुसरा प्रकार पाथर्डी फाटा परिसरात घडला. अमित एकनाथ बोरसे (वय 20, रा. सुमन अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक) या युवकाने काल (दि. 5) दुपारच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमध्ये असलेल्या छताला असलेल्या सिलिंगच्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती सोमनाथ बोरसे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यास कळविली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
आत्महत्येचा तिसरा प्रकार पखाल रोड येथे घडला. गीता विनायक कांबळे (वय 70, रा. ॲलिव्हिया अपार्टमेंट, रॉयल कॉलनी, पखाल रोड, नाशिक) या वृद्ध महिलेने काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात कारणातून बेडरूममध्ये असलेल्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

आत्महत्येचा चौथा प्रकार गंगापूर रोड येथे घडला. रामनरेश बरविला भैसट (वय 31, रा. बाखरानगर, उत्तर प्रदेश) हा गंगापूर रोडवरील श्री गुरुजी हॉस्पिटलमागे सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर काम करतो. त्याने काल (दि. 5) सकाळी 8 वाजेच्या पूर्वी जवळच असलेल्या झाडाला केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती त्याचा सहकारी हरिष मोहननाथ घोद (रा. उत्तर प्रदेश) याने गंगापूर पोलीस ठाण्यास कळविली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

आत्महत्येचा पाचवा प्रकार अंबड परिसरात घडला. पूनम गणेश सोनवणे (वय 24, रा. अन्नपूर्णा रो-हाऊस, कारगिल चौक, दत्तनगर, सिडको) या युवतीने राहत्या घरी दि. 17 मार्च रोजी टॉयलेट क्लिनर पिले होते. त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जयराम हॉस्पिटल व नंतर ॲपेक्स रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार अहिरराव करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group