Nashik : अंबडला तरुणाकडून 12 किलो गांजा जप्त
Nashik : अंबडला तरुणाकडून 12 किलो गांजा जप्त
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- गांजाची साठवणूक करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाच्या ताब्यातून गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने 1 लाख 39 हजार रुपये किमतीचा 12 किलो गांजा हस्तगत केला आहे.

याबाबत गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस हवालदार विशाल काठे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने आरोपी यश ऊर्फ बाज्या राजेंद्र पाटील (वय 25, रा. पद्मश्री रो-हाऊस, अंबड लिंक रोड, नाशिक) याने गांजाची विक्री करण्यासाठी घरामध्ये साठवणूक केल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने संशयित यश पाटील याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या पँटच्या उजव्या बाजूच्या खिशात एक मोबाईल फोन व एक पत्र दिसून आले. नंतर दक्षिणमुखी लोखंडी गेटच्या आतमध्ये प्रवेश करताना पुढे लाकडी दरवाजा दिसला. घरात प्रवेश करताच 10 बाय 15 फुटांचा हॉल व त्यामध्ये सोफासेट होता. सदर हॉलमधील साहित्याची झडती घेतली असता त्यात काहीही आढळून आले नाही; मात्र बेडरूममधील पश्चिम दिशेला एक प्लास्टिकची गोणी दिसून आली. ही गोणी उघडून पाहिली असता त्यामधून उग्र वास आल्याने याबाबत विचारले असता त्यात गांजासदृश अमली पदार्थ असल्याची खात्री पटली. 

या कारवाईत पोलिसांनी मोबाईल फोनसह प्लास्टिकच्या गोणीमध्ये असलेला 11 किलो 650 ग्रॅम वजनाचा 1 लाख 39 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात यश ऊर्फ बाज्या पाटील याच्याविरुद्ध एमपीडीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group