नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांची 16 वर्षीय अल्पवयीन भाची आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. 21 वर्षीय आरोपीने या अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर एक वर्षापासून अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले, तसेच तिला गर्भवती केल्याची बाब लक्षात आल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन करीत आहेत.