नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित पवन राजेश सोनी (वय 29, रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हा फोटोग्राफर असून, त्याने दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भुजबळ फार्म परिसरात कुठलीही परवानगी न घेता ड्रोन उडविले.
याबाबत ड्रोन नियम कलम 50 चे उल्लंघन केले म्हणून पवन सोनीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.