नाशिक : नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना पेठरोड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सीताराम गणपत सापटे याचा विवाह 12 वर्षांपूर्वी गंगुबाई सोबत झाला होता. त्यांना 3 मुलं पण आहेत. सितारामला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी तिला शिवीगाळ व मारहाण करायचा.
ती नोकरी करत नाही म्हणून त्रास द्यायचा. तसेच दुसरे लग्न करायचे असल्याचे नेहमी तिला सांगायचा. या छळाला ती कंटाळली होती. अखेर तिने आत्महत्या करून आपले जीवन संपविले.
याप्रकरणी काशीराम तुळशीराम दरोडे यांच्या वरील अर्थाच्या फिर्यादीवरून सीताराम विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.