Nashik : जिमच्या चेंजिंग रुममधून  पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
Nashik : जिमच्या चेंजिंग रुममधून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जिम करताना आणलेल्या बॅगेत ठेवलेली डायमंडची अंगठी, रोख रक्कम व इतर महत्त्वाची कागदपत्रे असा पावणेदोन लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना निवेक क्लब येथे असलेल्या आर्यन स्पोर्ट्स जिममध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विक्रांत योगेश गुळवे (वय 29, रा. शिवाजीनगर, संदीप सुपर मार्केटसमोर, सातपूर) हे दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सातपूर एम. आय. डी. सी. मध्ये असलेल्या निवेक क्लब येथे असलेल्या आर्यन स्पोर्ट्स जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आले होते.

त्यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या बॅगमध्ये प्लॅटिनम गोल्ड डायमंडची अंगठी, रोख रक्कम, अ‍ॅपल कंपनीचा इअर पॉड, शर्ट व पँट, कारची चावी, जिमसाठी लागणारी बॅग, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एच. डी. एफ. सी., कॅनरा व बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड बॅगमध्ये ठेवून ते चेंजिंग रूममध्ये गेले. त्यानंतर ते कपडे बदलून व्यायामासाठी गेले.

Nashik : भाजपची चिंता वाढणार; माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत?

ही संधी साधून अज्ञात चोरट्याने चेंजिंग रूममध्ये ठेवलेल्या बॅगमधून 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज नजर चुकवून चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group