नाशिकरोडच्या
नाशिकरोडच्या "या" बांधकाम व्यावसायिकाकडून मागितली १० लाखांची खंडणी
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :-फ्लॅट विकायचे असेल तर दहा लाखांची खंडणी द्यावी लागेल, अशी एका बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, बांधकाम व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे. 

याबाबत प्रसिद्ध सदनिका बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५, रा. प्रकाशनगर, शिखरेवाडी, नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलिसात फिर्याद दिली आहे, की २१ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गोरे हे त्यांच्या मालधक्का रोड, नुरी मस्जिद नाशिकरोड येथे सुरू असलेल्या इमरात बांधकामच्या साईटवरील ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्या ओळखीचे किशोर भारती याने तिथे येऊन मला दहा लाख रुपये दे, नाही तर मी तुला या बांधकाम साईट वरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, असे म्हणत तुझी ही साईट बंद करून टाकीन, अशी धमकी दिली.

त्यानंतर पुन्हा संध्याकाळी साडेपाच वाजेला पुन्हा भारती याने मालधक्का आमचा आहे, असे म्हणत धमकी देत दहा लाखाची मागणी करून तुला बघून घेईल व शिवीगाळ केली. त्यामुळे प्रमोद गोरे यांनी नाशिकरोड पोलिसांत भारती विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.

 जुने नाशिक मध्ये भीषण आगीत 50 वाहने जळून खाक, दोन भंगार गोडावूनसह तीन घरेही जळाली

दिवसाढवळ्या बिल्डरकडे धमकी देऊन लाखोंची मागणी होत असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group