जेलरोड वरील एका सोसायटीत पार्क केलेल्या दोन दुचाकी गाड्या व सायकल अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जेलरोड वरील चंपानगरी भागातील सिद्धी दर्शन सोसायटीत राहणाऱ्या आरती लक्ष्मण पालवे यांच्या दोन दुचाकी रात्रीच्या वेळी जाळण्यात आल्या. सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेल्या त्यांच्या ॲक्टिव्हा मोटारसायकल व पलेझर मोटारसायकल तसेच त्यांच्या भाचीची सायकल पार्क केली होती.
३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या गाड्या जाळून नुकसान केले. पालवे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.