कामटवाडेत घरफोडी; 35 तोळे सोने-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपये लंपास
कामटवाडेत घरफोडी; 35 तोळे सोने-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपये लंपास
img
दैनिक भ्रमर

कामटवाडेत घरफोडी होऊन सुमारे 35 तोळे सोने-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाख रुपये चोरट्याने लंपास केले. 

फिर्यादी सुरेश अरविंद सोनवणे (रा. योगेश्वर संकुल कामटवाडे शिवार, सिडको) ही वृद्ध महिला एकटीच राहते. दरम्यान ही महिला 1 मे रोजी मालेगाव येथे काही कामानिमित्त मुलासह गेली होती. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

यावेळी घरातील कपाटात असलेले 5 तोळे वजनाची दीड लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 4 तोळे वजनाची सोन्याची पोत, 2 तोळे वजनाचा 60 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस, पावणेचार तोळ्याचा 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा चपलाहार, 3 तोळे वजनाच्या 90 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, 2 तोळे वजनाच्या 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या साखळ्या 4 तोळे वजनाची 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 1 सोन्याची साखळी, अर्धा तोळे वजनाचे 15 हजार रुपये किंमतीचे कानातले झुबे, 3 ग्रॅम वजनाच्या 9 हजार रुपये किंमतीच्या रिंगा, प्रत्येकी अडीच तोळे वजनाच्या 75 हजार रुपये किंमतीच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, 2 ग्रॅम वजनाची 6 हजार रुपये किंमतीची सोन्याची नथ, 9 ग्रॅम वजनाचे 27 हजार रुपये किंमतीच्या मणी मंगळसूत्र, 5 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, दीड ते दोन किलो वजनाचा देवाचा चांदीचा साज व भांडे सुमारे 1 लाख 50 हजार रुपये व 2 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 13 लाख 17 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन चोरुन नेला.


याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोंदळे करीत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group