सातपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने मागितली 20 हजारांची लाच; गुन्हा दाखल
सातपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याने मागितली 20 हजारांची लाच; गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- सातपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचऱ्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंता बळवंतराव महाले (वय 38) असे लाच मागणाऱ्या सातपूर पोलिस ठाण्याच्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा भंगारचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांचे भंगार दुकान हे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून महिला यांनी तक्रारदार यांचा भावाला त्यांचे भंगार दुकानातून काही कारण न सांगता चौकशी साठी सातपूर पो. ठाणे येथे घेऊन गेले.

तक्रारदार यांना फोन करून तुला व तुझ्या भावाला एखाद्या गुन्ह्यात अटक  करून टाकू, जर तुला तुमचावर गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल तुम्ही आम्हाला 25,000 रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नाशिक कार्यालय येथे तक्रार दिली.  त्यांनी पडताळणी केली असता महाले यांनी 25000 ची मागणी करून तडजोडी अंती 20,000 रुपयाची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले आहे. त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा डोळस, पो. ह .संदीप वणवे, पो. ना/ संदीप हांडगे, पो. शि/ सुरेश चव्हाण
इतर बातम्या
Join Whatsapp Group