नाशिकरोड पोलिसांनी केले सराईत गुन्हेगाराकडून एक काडतुससह गावठी कट्टा जप्त
नाशिकरोड पोलिसांनी केले सराईत गुन्हेगाराकडून एक काडतुससह गावठी कट्टा जप्त
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने कारवाईचा धडाका लावला असुन आज एका सराईत गुन्हेगाराकडून पथकाने जिवंत काढतो काडतुस सह गावठी कट्टा हस्तगत केला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त व डॉ. सचिन बारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, सुभाषरोड, भारती मठ येथे एक सराईत गुन्हेगार गावठी कट्टा (पिस्टल) सारखे हत्यार घेऊन मोकाट फिरत असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शोध पथकातील गोकुळ कासार यांना मिळाली.

वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सदर ठिकाणी सापळा रचला असता सदर ठिकाणी अनिकेत राजू जॉन उर्फ केरला (वय 24, राहणार भारती मठ,सुभाष रोड,नाशिक रोड) हा संशयित सराईत गुन्हेगार मिळून आला. त्याची अंग झडती घेतली असता त्याकडे एक देशी बनावटीचे गावठी कट्टा (पिस्टल) व जिवंत काडतुस असा सुमारे 31 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. अनिकेत जॉन हा सराईत गुन्हेगार असुन यापूर्वीही त्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हा कट्टा त्याने पंचवटी येथील खून झालेल्या सराईत गुन्हेगारांकडून मिळवल्याचा सांगितले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, संदिप पवार, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, अरुण गाडेकर, देवरे, योगेश रानडे आदींनी पार पडली.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group