नाशिकरोड पोलिसांनी तीन चोरट्यांकडून केला साडेसहाला लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत
नाशिकरोड पोलिसांनी तीन चोरट्यांकडून केला साडेसहाला लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील नाशिकरोड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करीत तीन अट्टल संशयात कडून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन त्यांच्याकडून नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात यश प्राप्त केले आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले, की 31 डिसेंबर रोजी कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तात पोलीस अधिकारी कर्मचारी व्यस्त असताना नाशिक पुणे महामार्गावरील पळसे गाव येथे अज्ञात संशयित चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडून सुमारे दीड लाख रुपयाची देशी दारूच्या बाटल्या करून नेल्या होत्या.

याचा तपास सुरू असताना नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हे शोध पथकांनी घटनास्थळाचा सीसीटीव्ही फुटेज तपासले. या चोरीमध्ये सेंट्रो कारचा वापर करणाऱ्या एका संशयीताची ओळख पटली.

त्याचा शोध गुन्हे शोध पथकाने सुरू केला. गोपनीय माहितीनुसार संभाजीनगर,वैजापूर येथील वंजारगाव येथून रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन वय 26 या चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्या म्होरक्या बाबतीत विचारणा केली असता तो मुसळगाव,एमआयडीसी सिन्नर या ठिकाणी असल्याचे समजले. त्याचा शोध घेत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी एका चहाच्या टपरीवर पोहोचले.

चहा पिण्यास आलेल्या संशयीतास पोलीस असल्याचे समजल्यानंतर त्याने तिथून पळ काढून एका कंपनीच्या भिंतीवर उडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस कर्मचारी अजय देशमुख व विशाल कूवर यांनी त्याचा पाठलाग करून अश्रफ हमीद शेख याला शीताफिने ताब्यात घेतले व त्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिलीप रामदास यादव वय 28 राहणार सिन्नर याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

या तिघा संशयित चोरट्यांनी नाशिकरोड,उपनगर, पंचवटी त्याचबरोबर संगमनेर व श्रीरामपूर या भागात घरफोड्या केल्या असून त्यांच्याकडून चोरलेली सेंट्रो कार,पाच दुचाकी व देशी दारू अश्या नऊ गुन्ह्याची उकल करून साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

यातील अश्रफ हमीद शेख वय 37 रा. सिन्नर हा सराई गुन्हेगार असून ४० पेक्षा जास्त गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांनी पळ काढला असून याप्रकरणी काही कर्मचारी निलंबित करण्यात आले होते याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,पोलीस विभाग मोनिका राऊत,पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, गुन्हे शोध पथकाचे अविनाश देवरे, विजय टेमगर,संदीप पवार,संतोष पाटील,विष्णू गोसावी, समाधान वाजे,नाना पानसरे,अजय देशमुख, रोहित शिंदे,महेंद्र जाधव,अरुण गाडेकर,संतोष इंगळे,गोकुळ कासार, सागर आडणे,नितीन शिंदे, योगेश रानडे यांनी पार पाडली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group