नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना बढती
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना बढती
img
दैनिक भ्रमर


नाशिक :- राज्यातील 14 पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश आज सायंकाळी सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले.

त्यामध्ये नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांची बढती होऊन त्यांची मुंबई येथे अपर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीत  सहायक संचालक म्हणून अरविंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही ती 1-2 दिवसांत होण्याची शक्यता आहे. देशमाने यांनी आपल्या कार्यकाळात नाशिक ग्रामीण मध्ये अवैध धंद्या विरुद्ध मोठी मोहिम सुरु केली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group