सातपूर - राजवाडा परिसरात पतीने पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. सिंधूबाई पिठे (४८) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की महिला एका हॉटेलमध्ये काम करत होती. पती पंधरा दिवसांपूर्वी आला होता. पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने कोयत्याने हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुलगा घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरुन कडी लावलेली असल्याचे निदर्शनास आले. त्याने कडी उघडून पाहिल्यानंतर आई रक्ताच्या थारोळ्यात दिसली. तत्काळ पोलिसांना कळवले. महिलेचे शिर धडा वेगळे करत निघृण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पती दिलीप पिठे फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे व उपनिरीक्षक एस.डी. खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पती-पत्नीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.