सातपूर मधील मनसेचे माजी नगरसेवक तथा माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पवन पवार व काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांनीही यावेळी प्रवेश केला.
योगेश शेवरे यांनी सातपूर प्रभाग क्रमांक ११ मधून मनसेतर्फे निवडणूक लढवली होती. त्यांनी सातपूर प्रभाग सभापती म्हणूनच काम पाहिले होते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख बंटी तिदमे, विक्रम नागरे,अभय महादास,अक्षय पाटील उपस्थित होते