इंदिरानगर परिसरात महिलेचा खून?
इंदिरानगर परिसरात महिलेचा खून?
img
दैनिक भ्रमर

इंदिरानगर भागात असलेल्या एका पेट्रोल पंपमागील भागात महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. निशा मयूर नागरे (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मयत निशा ही आपल्या पती समवेत इंदिरानगर परिसरात सदाशिव नगर मध्ये कृष्णा प्राईड सोसायटीत राहते. आज दुपारी त्यांची मोलकरीण घरकाम करण्यासाठी आली असता तिला निशा यांचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळला. तिने त्वरित पोलिसांना याबाबत कळविले.

महिलेचा खून करून संशयिताने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मारेकऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group