नाशिक : ऑफिस कामासाठी बाहेर जायचे असल्याचे सांगून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पंचवटीत घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शरद (बबन) बोडके (रा. हिरावाडी, पंचवटी) हा सेतू केंद्र चालवतो. त्याच्याकडे ही पीडित मुलगी काम करते. ऑफिस कामासाठी बाहेर जायचे आहे असे सांगून तो तिला त्याच्या कार मध्ये बसवून त्याच्या घरी घेऊन गेला.
तिथे किचन तसेच बेडरूम मध्ये नेऊन कोरल ड्रॉ व फोटोशॉप शिकवण्याचा बहाणा करून तिला त्याच्या जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडितेच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात बोडके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद बोडके हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते.