धक्कादायक : नाशिकमध्ये एमडी ड्रग विक्रीत महिलांचाही सहभाग, श्वान मॅक्सची भूमिका ठरली महत्त्वाची
धक्कादायक : नाशिकमध्ये एमडी ड्रग विक्रीत महिलांचाही सहभाग, श्वान मॅक्सची भूमिका ठरली महत्त्वाची
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आता महिलांचाही वापर होत असल्याचे समोर आले आहे.

एका प्रकरणामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन महिलांसह एका पुरुषाला अटक केली असून हे अमली पदार्थ शोधण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या श्वान मॅक्सचा देखील उपयोग झाला आहे. 

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईने पुन्हा एकदा एक नवीन खुलासा समोर आला आहे. 

या पथकातील प्रभारी अधिकारी सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरात तीन महिला एमडी ड्रग विकण्यासाठी तयारी करत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर अंमली विरोधी पथकाच्या प्रमुख सुशीला कोल्हे व त्यांच्या पथकाने सापळा रचून गणेश कैलास गिते (वय 45, रा. मखमलाबाद), स्वीटी सचिन अहिरे (वय 28, रा. मेहेरधाम), ऋतुजा भास्कर झिंगाडे (वय 22, रा. शिवाजीनगर, नाशिक), पल्लवी गणेश निकुंभ उर्फ सोनाली शिंदे (वय 36, रा. अमृतधाम) या तिघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार लाख पंधरा हजार पाचशे रुपये किंमतीचे 78.5 ग्रॅम एमडी ड्रग इतर साहित्य एक लाख 97 हजार 860 रुपयांचे आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी सुशीला कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

पोलीस आयुक्तांच्या या पथकाने केलेल्या कारवाईमुळे प्रथमच नाशिक शहरात अमली पदार्थ विक्रीच्या प्रकरणांमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

Join Whatsapp Group