नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या माजी अध्यक्षा तसेच नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या सलग 20 वर्षे अध्यक्ष असलेल्या डॉ. शशीताई अहिरे यांचे आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास दु:खद निधन झाले.
नाशिक येथील रेणुकानगर पतसंस्थेच्या संस्थापक आणि रेणुकानगर गृहनिर्माण संस्थेच्या अध्वर्यू म्हणून त्यांना ओळखले जाते. सहकार, दिव्यांग विद्यार्थी, महिला, अनाथ मुले अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रचंड काम केले आहे. भ्रमर परिवाराच्या त्या ज्येष्ठ मार्गदर्शक होत्या. अहिरे परिवाराच्या दु:खात भ्रमर परिवार सहभागी आहे.