मुंबई :- शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सातपूर परिसरातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक बाजीराव दातीर यांनी आज मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, शिवसेना महानगरप्रमुख प्रविण तिदमे, माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदा गायकर आणि मान्यवर उपस्थित होते.