पेठला पिकअपसह १५ लाखांचा गुटखा जप्त
पेठला पिकअपसह १५ लाखांचा गुटखा जप्त
img
दैनिक भ्रमर

पेठ  - पेठ-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चेकनाक्यावर गुजरात राज्याकडुन येणारा पिकअप क्रमांक एम एच १५ जी डी २७०८ हा गुटखा घेऊन नाशिक कडे जात असतांना पोलीसांनी पकडला असुन अंधाराचा फायदा घेत वाहन चालक पसार झाला.

या वाहनात विमल गुटखा व तंबाखु असा १४ लाख ५२ हजाराचा माल व ४ लाख रूपये किंमतीचे पिकअप वाहन असा १८ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group