नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीसाठी आज नाशिक शहरातील पंचवटीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र ही परीक्षा चालू असताना अचानक तांत्रिक कारण देत ती रद्द करण्यात आल्याने पहिल्या सत्रातील अर्धा पेपर दिलेल्या परीक्षार्थींना पुढील पेपर लिहिण्यापासून मज्जाव करण्यात आला. ही परीक्षा तांत्रिक कारणामुळे रद्द झाली असून पुढे घेतली जाणार असल्याचे तेथील परीक्षा केंद्र व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिपिक व शिपाई आदी ३७६ पदांसाठी राज्यभर विविध केंद्रांवर आज परीक्षा घेण्यात येणार होती. दोन सत्रात या परीक्षा होणार असून त्याकरिता सुमारे ३१,५५६ युवक युवतींना परीक्षेसाठी राज्यभरातील अनेक केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी नाशिक शहरातील पंचवटी येथील एका कॉलेज मध्ये आज (दि.२१) सकाळी आणि दुपारी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार होती.
पहिल्या सत्रातील परीक्षा सकाळी दहा ते बारा या वेळेत होती त्याकरता राज्यभरातून नाशिक केंद्रावर सुमारे ४०० विद्यार्थी त्यामध्ये काही तरुण-तरुणी या परीक्षेसाठी परिवारासह व पाल्यांना घेऊन (लहान मुले) परीक्षा केंद्रात दाखल झाले होते. पेपराला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटातच तांत्रिक कारण दाखवून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगून सर्व परीक्षार्थींना अर्ध्या पेपरावरून उठवण्यात आले.
पहिला सत्रात पेपर सोडवीत असतानाच एका परीक्षार्थीलाच आलेल्या अडचणीमुळे त्याने केंद्रप्रमुखाला कळविले पेपर सोडवताना होत असलेला अडचणींची खात्री करून त्याने सदर बाब चंद्रपूर येथील वरिष्ठांना कळविली. व लगेचच परीक्षा रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले त्यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न सोडवल्यानंतरही अर्ध्यावर सोडून माघारी जाण्यास सांगितले.
आता अचानक झालेला या गोंधळामुळे परीक्षार्थी घाबरले. त्यांनी याबाबत केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता तांत्रिक कारण सांगत हीच परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे असे कळविले. मुला बाळांसह आलेले काही परीक्षार्थी गोंधळात पडले. अनेकांनी संताप व्यक्त केला. काही महिला तर मुलांना घेऊन आल्या होत्या त्यांची गैरसोय झाली. अक्षरशः रडत त्या माघारी फिरल्या.
या परीक्षेकरता राज्यातील चंद्रपूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, बीड, जालना, वर्धा, परभणी, नागपूर आदी जिल्ह्यातून चारशेहून अधिक परीक्षार्थी परीक्षा केंद्राच्या परिसरात कालपासूनच येऊन दाखल झाले होते. अक्षरशः रस्त्यावर रात्र झोपून काढत सकाळी केंद्रावर पोहोचल्यावर परीक्षा देत असताना झालेल्या या प्रकारामुळे सर्व तरुण-तरुणींनी संताप व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या परीक्षेकरिता ३७६ पद भरती करण्यात येणार असून त्याकरिता ३१,५५६ परीक्षार्थींना प्रत्येकी ५६० रुपये परीक्षा फी आकारण्यात आली होती. या अनुषंगाने आज या बँकेच्या तिजोरीत १ कोटी ८० लाख रुपये जमा झाले असताना या परीक्षा केंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात करण्यात आली नसल्याची खंत परीक्षार्थीनी बोलून दाखवली.
त्यामुळे काही परीक्षार्थीनी संताप व्यक्त करीत तिथल्या केंद्रप्रमुखांना विचारले असता आजच्या दोन्हीही सत्रातल्या परीक्षा रद्द असून या परीक्षा पुढे घेण्यात येणार असल्याचे सांगितले. आमच्याकडे गावाला जाऊन परत परीक्षेला येण्याची व्यवस्था नाही पैसाही नाही. जर भरती करायचीच नव्हती तर हा फारच कशाला केला असता संता व्यक्त करीत काही परीक्षार्थी दिवसभर या कॉलेजच्या केंद्राबाहेर बसून होते.
या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर पोलिसही दाखल झाले त्यांनी केंद्रप्रमुखांच्या सांगण्यावरून परीक्षार्थींना माघारी जाण्यास सांगितले, आणि काही वेळानंतर पोलीसही निघून गेले. भविष्यात बँकेत नोकरी मिळेल ही मोठी अपेक्षा घेऊन परीक्षेला दाखल झालेल्या या सर्व तरुण-तरुणींची गैरसोय झाल्याने केंद्रप्रमुखांनी ही हात झटकून परवा येण्यास सांगितले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या पदभरतीसाठी पहिल्या सत्रातील परीक्षार्थींचे आठ वाजता रिपोर्टिंग झाले. साडेनऊ वाजता परीक्षा केंद्र चे गेट बंद करण्यात आले आणि सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये परीक्षा होणार होती. पेपर सोडविला जात असतानाच एका परीक्षार्थीला उत्तरे देताना टेक्निकल अडचणी येत असल्याचे पाहून त्याने केंद्रप्रमुखाला सांगितले. केंद्रप्रमुखांनी त्याची पडताळणी केली त्यानंतर ही परीक्षा रद्द झाल्याच्या आम्हाला कळविण्यात आले आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुक्त केले. आणि ही परीक्षा २३ तारखेला होणार असल्याचे सांगितले, असे परीक्षा केंद्र समन्वयक सुशील गोस्वामी यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षांसाठी चंद्रपूर भंडारा जिल्हा ठिकाणी केंद्र असताना तिथल्या परीक्षार्थींना लांब पाठवण्यात आले त्यांची सोय बघण्याऐवजी गैरसोय कशी होईल हेच प्रामुख्याने बघितले गेले. जर नोकरी द्यायचीच नसेल तर हा फासच कशासाठी युवकांची घोर फसवणूक आहे, असा आरोप वर्धा येथील परीक्षार्थी शुभम कानिंदे यांनी केला.
पहा काय म्हणणे आहे परीक्षार्थींचे