सीएस फायनलमध्ये नाशिकचा शुभम चोरडिया देशात तिसरा
सीएस फायनलमध्ये नाशिकचा शुभम चोरडिया देशात तिसरा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कंपनी सेक्रेटरी (सीएस) या राष्ट्रीय स्तरावरील अंतिम परीक्षेत नाशिकच्या शुभम चोरडिया याने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. शुभमचे शालेय शिक्षण येथील निर्मला कॉन्व्हेंटमध्ये झाले. नंतर त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला झाले आहे.

आपल्या यशाविषयी बोलताना शुभम म्हणाला, की तो रोज सहा ते आठ तास अभ्यास करून अभ्यासात सातत्य ठेवत होता. नियमित अभ्यास करण्यासोबत त्याने उजळणीवर भर दिला. या माध्यमातून यश मिळविता आले.

सीएस फायनलची परीक्षा जून 2024 मध्ये घेण्यात आली होती. यासाठी त्याला मुंबईतील प्रो विंग्ज सीएस या क्लासचे संचालक अभिषेक शर्मा यांचे मार्गदर्शन मिळाले. दरम्यान, शुभमने डिसेंबर 2020 मध्ये सीए फाऊंडेशन या परीक्षेतही राष्ट्रीय क्रमवारीत 19 वा क्रमांक पटकाविला होता. त्याने नुकतेच मुंबईतून एल. एल. बी. अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातही त्याने यश संपादन केले.

भारतात कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या स्तरांवर अनेक परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जिद्द आणि मेहनत आवश्यक आहे. भारतामध्ये कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी चांगली पात्रता आवश्यक असते.
शुभमचे वडील डॉ. सुनील चोरडिया हे पॅथॉलॉजिस्ट आहेत. शुभम आपल्या यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक अभिषेक शर्मा व पालकांना देतो. या यशाबद्दल शुभमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group