नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-गर्दीत बस,रेल्वे मध्ये चढतांना महिला प्रवाशांची नजर चुकवून त्याचे पर्स व दागिने चोरणाऱ्या महिलेला नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. तिच्या जवळून पाऊण लाख रुपयाचे पावणे दोन तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
या बाबत पोलिसांनी सांगितले कि,मालधक्का रोड, नुरी मज्जीत समोर गर्दीत बस,रेल्वे मध्ये चढतांना महिला प्रवाशांची नजर चुकवून त्याचे पर्स व दागिने चोरणाऱ्या महिला फिरत आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार विजय टेमगर,अजय देशमुख, नाना पानसरे यांनी आरती विनोद नानवटकर (वय 32)राहणार देवळाली गाव, सोमवार बाजार, नाशिकरोड हिस ताब्यात घेऊन तीची चौकशी केली असता तिने दोन गुन्ह्यात 85 हजार रुपये किंमतीचे 17ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुद्दमाल हस्तगत केला आहे.
या प्रकार च्या अनेक चोऱ्या बस व रेल्वे स्थानक परिसरात सण उत्सवात घडत असतात. मात्र प्रवासी बाहेर गावी जाताना उशिरा चोरी लक्षात येत असल्याने अनेक पिडीत तक्रार करीत नाही.या चोरट्या महिलेचा गुन्हे शोध पथकाने शोध लावल्याने अनेक गुन्हे किंवा तिच्या साथीदार महिला ची उकल होऊ शकते.
गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, साह्ययक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी कौतुक करीत अभिनंदन केले.