खुनाच्या घटनेने नाशिक हादरलं! पंचवटी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तरूणाची हत्या
खुनाच्या घटनेने नाशिक हादरलं! पंचवटी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तरूणाची हत्या
img
Dipali Ghadwaje
नाशिक :  नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुन्हा एकदा नाशिक खुनाच्या घटनेने हादरले आहे. पंचवटी परिसरातील नरोत्तंमभवन समोर रस्त्यावर मार्केट यार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवार ता .१० रोजी मध्यरात्री सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अतुल सूर्यवंशी (वय ३२ ,रा .पेठ रो ड, पंचवटी नाशिक) असे मयताचे नाव आहे. पेठ रोडवरील राहणाऱ्या बत्तीस वर्षीय अतुल सूर्यवंशी हा मार्केट यार्ड येथे आपल्या मोठ्या भावाकडे हमालीचे काम करत होता . मंगळवार ता .१० रोजी मध्यरात्री सुमारास पंचवटीतील नरोत्तम भवन समोर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर अतुल यांचा काही संशयितांनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे.  पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group