इन्स्टाग्रामवर जमली मैत्री, मग प्रेम झालं...तरुणीसोबत नंतर काय घडलं? वाचा
इन्स्टाग्रामवर जमली मैत्री, मग प्रेम झालं...तरुणीसोबत नंतर काय घडलं? वाचा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात करून एका तरुणाने मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणीची आरोपी राहिल ऊर्फ आसिफ नुरुद्दीन सय्यद (रा. शिवाजीनगर, सातपूर) याच्यासोबत डिसेंबर 2023 मध्ये इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यातून त्यांच्या रोज ऑनलाईन गप्पाटप्पा होऊ लागल्या. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री निर्माण होऊन त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. तेव्हा त्यांचे ऑनलाईन बोलणे सुरू असताना त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. जानेवारी 2024 मध्ये आरोपी राहिल सय्यद याने या पीडितेचा विश्‍वास संपादन करून तिला सातपूर-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले.

तिला शारीरिक संबंध केल्याने प्रेम वाढते, असे सांगून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले. हा प्रकार जानेवारी ते दि. 22 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होता. या प्रकरणी पीडित तरुणीने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राहिल सय्यद याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group