नाशिक मधील
नाशिक मधील "त्या" युवकाच्या खुनातील आरोपी 9 तासांत जेरबंद
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या पंडित कॉलनीत युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी 9 तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

खून केल्यानंतर आरोपी अथर्व दाते, अक्षय तरे व रितेश साळुंखे हे पेठ भागात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपींचा शोध घेत होते. पेठ परिसरात शोध घेतला असता मुख्य आरोपी अथर्व दाते, अक्षय तरे व एक अल्पवयीन आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्यांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group